CM Chashak काय आहे???

CM चषका’बद्दल

what is cm chashak

CM चषक हा एक असा उपक्रम आहे ज्यामुळे महाराष्ट्रातील युवकांच्या कलागुणांना एक मंच उपलब्ध होईल तसेच क्रीडा आणि सांस्कृतिक वातावरणनिर्मिती होण्यास मदत होईल. महाराष्ट्रभरातील स्थानिक प्रतिभावंतांना शोधून त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाला सुरुवात केली जात आहे.
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या स्वस्थ आणि सुदृढ भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी हा पुढाकार घेतला जात आहे.
महाराष्ट्रातील तरुणांना एका मंचावर एकत्र आणण्यासाठी आणि त्यांच्यातील असलेली क्रीडा व सांस्कृतिक कलेची आवड वृद्धिंगत करण्यासाठी CM चषक हा एक प्रयत्न आहे. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्राच्या २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये व ३६ जिल्ह्यांमध्ये विविध क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात ३० ऑक्टोबर २०१८ रोजी होईल. १२ जानेवारी २०१९ रोजी युवकांचे प्रेरणास्थान असलेले स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी म्हणजेच "राष्ट्रीय युवा दिनी" या उपक्रमाचा समारोप होईल.
भारतात क्रीडा, संगीत, नृत्य आणि कलेचा इतिहास वैदिक यूगापासून आहे. ‘CM चषक’ महाराष्ट्राच्या युवा पिढीला विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्यामाध्यमातून कला आणि क्रीडा क्षेत्रातील दाखवण्याची संधी प्रदान करीत आहे. खेळ, कला आणि क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून तरुणांच्या अफाट ऊर्जेला चालना देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे.

No comments