FAQ ? तुमच्या सामान्य प्रश्नांची उत्तरे पहा.

FAQs

1) CM चषक काय आहे?
A) CM चषकद्वारे राज्यातील युवा शक्तीला आणि प्रतीभेला नवा व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आहे. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुदृढ व खुशहाल भारताचे स्वप्न सत्यात उतरवण्याचा या महोत्सवाद्वारे केला आहे.
2) CM चषक अंतर्गत काय होणार आहे?
A) २८८ विधानसभांमध्ये आणि राज्यातील ३६ जिल्ह्यांमध्ये हा महोत्सव आयोजित केला जात आहे. याचा समारोप समारंभ राष्ट्रीय युवक दिनदिवशी म्हणजे १२ जानेवारी २०१९ रोजी राज्यस्तरावर आयोजित केला जाणार आहे.
3) CM चषकमध्ये कोणत्या खेळांचे आयोजन केले आहे?
A) क्रिकेट, व्हॉलीबॉल, कबड्डी, खो-खो, कॅरम, १०० मी. आणि ४०० मी. रेस व कुस्ती अशा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्य, गायन, चित्रकला व रांगोळी या स्पर्धांचे आयोजन कला स्पर्धांसाठी केले आहे.
4) CM चषकच्या तारखा कोणत्या आहेत?
A) CM चषकची नोंदणी १५ ऑक्टोबर रोजी सुरु झाल्या आहेत. स्पर्धा ३० ऑक्टोबर पासून सुरु होतील. प्रत्येक विधानसभेतील स्पर्धांच्या तारखा वेगवेगळ्या असतील आणि त्या सहभागींना वैयक्तिक रित्या कळवल्या जातील.
5) CM चषकची नोंदणी केव्हा आणि कशी सुरु होणार आहे?
A) १५ ऑक्टोबर रोजी नोंदणी सुरु झाली आहे. आपण वेबसाईटवरून नोंदणी करू शकता.
6) नोंदणी नंतर मला माझ्या स्पर्धेची तारीख आणि वेळ कशी समजेल?
A) आपल्याला SMS आणि फोनकॉलद्वारे माहिती कळवण्यात येईल.
7) CM चषकमध्ये भाग घेणे मोफत आहे का?
A) हो, CM चषक संपूर्णतः मोफत आहे.
8) CM चषकसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख कोणती?
A) ओंनलाईन नोंदणीची १५ नोव्हेंबर,२०१८ शेवटची तारीख आहे.

9) माहिती भरल्यानंतर त्यात बदल करता येऊ शकतो का?

A) नाही. तुम्ही सबमिट केलेल्या माहितीमध्ये बदल करू शकत नाही.

10) CM चषकमध्ये सहभागी होण्यास कोण पात्र आहे?
A) जी व्यक्ती १६ वर्षांहून अधिक आहे ती व्यक्ती CM चषकमध्ये सहभागी होण्यास पात्र आहे.
11) CM चषकमध्ये भाग घेण्यासाठी काही पात्रता निकष आहेत का?
A) नाही, CM चषक सर्वांसाठी खुले आहे.
12) CM चषक महिला आणि पुरुष या दोघांसाठी खुले आहे का?
A) होय, स्त्री आणि पुरुष दोघेही सहभागी होऊ शकतात. सर्व क्रीडा स्पर्धांमध्ये महिला आणि पुरुष भाग घेऊ शकतात. कला स्पर्धांमध्ये, संघात स्त्री आणि पुरुष एकत्र असू शकतात. कला स्पर्धा लिंग निकषावर वेगळ्या केल्या जाणार नाहीत.
13) विजेत्यांसाठी काय बक्षिसे आहेत?
A) अधिक माहितीसाठी ‘बक्षिसे’ विभाग निवडा.
14) सहभागींना काय मिळेल?
A) अधिक माहितीसाठी ‘बक्षिसे’ विभाग निवडा.
15) एकापेक्षा अधिक स्पर्धांमध्ये मला भाग घेता येईल का? मला क्रीडा आणि कला अशा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेता येईल का?
A) हो, एकच व्यक्ती एकापेक्षा अधिक स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकते आणि क्रीडा आणि कला अशा दोन्ही स्पर्धांमध्ये भाग घेऊ शकते. पण जर एकाच संघाला इतर सांघिक कार्यक्रमांत भाग घ्यायचा असेल तर वेगळा नोंदणी फॉर्म भरावा. एकाच स्पर्धेसाठी अनेक नोंदण्या स्वीकारल्या जाणार नाहीत.
16) सांघिक स्पर्धांसाठी नोंदणी कशी करू?
A) आपण सांघिक स्पर्धांसाठी संघ फॉर्म भरून करता येईल. जर त्याच संघाला इतर सांघिक कार्यक्रमांत भाग घ्यायचा असेल तर वेगळा नोंदणी फॉर्म भरावा.
17) मला जो प्रश्न विचारायचा आहे, तो या प्रश्नावलीत नाही. मी आपल्याशी संपर्क कसा साधू?
A) आपल्या इतर प्रश्नांसाठी आम्हाला info@cmchashak.com या इ-मेल आयडीवर इ-मेल लिहून पाठवा.

5 comments:

  1. Sir Atta registration Karun upyog nahi ka date sampli

    ReplyDelete
    Replies
    1. 30 नोव्हेंबर ही शेवटची तारीख आहे भाऊ, अजून 2 दिब्स बाकी आहेत

      Delete
  2. Wrestling hi mat vr khelali jail ka?

    ReplyDelete
  3. CasinoTopOdds - Real Money Casino Review
    Looking for CasinoTopOdds? Check our 1 bet review of 카 심바 our top casinos, tenpro bonuses, games 승인전화없는 토토 꽁머니 and 켈로나 개조 mobile apps for December 2021.

    ReplyDelete
  4. Borgata Hotel Casino & Spa & Spa | DrmCD
    Find out more about Borgata 영주 출장마사지 Hotel 원주 출장안마 Casino & Spa, including upgrades, 경산 출장샵 guest rooms and packages, safety 안성 출장샵 measures, guest room 구미 출장안마 amenities,

    ReplyDelete