CM Chashak नियम व मार्गदर्शक तत्वे

नियम व मार्गदर्शक तत्वे
  • सर्व खेळाडूंनी आणि संघाने पुरवलेली माहिती खरी असल्याचे आम्ही प्रमाणित करत आहोत.
  • संघातील खेळाडू अथवा संघाचा भाग असलेल्या सर्व खेळाडूंचे वय १६ वर्षे व १६ वर्षांवरील आहे.
  • संघाच्या सर्व कृतींची जबाबदारी संबंधित संघाच्या कर्णधाराची असेल.
  • आयोजकांनी आखलेले नियम आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास सर्व खेळाडूंची सहमती आहे.
  • स्पर्धेदरम्यान मद्यपान करण्यास अथवा अंमली पदार्थांचे सेवन करण्यास सक्त मनाई आहे. स्पर्धेच्या परिसरात, स्पर्धा सुरु असताना अथवा स्पर्धेला उपस्थिती लावताना या नियमाचे पालन होणे अनिवार्य आहे.
  • संघ अथवा संघातील खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेताना, मद्य अथवा अंमली पदार्थांचे सेवन केलेले नसावे.
  • खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान सामंजस्याची भूमिका घेणे गरजेचे आहे. तसेच प्रेक्षक, माध्यमांचे प्रतिनिधी, स्पर्धा अधिकारी आणि इतर खेळाडूंशी मैत्रिपूर्ण आणि सभ्य वर्तन करणे अभिप्रेत आहे.
  • स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी अश्लील तसेच आक्षेपार्ह भाषेचा वापर करु नये.
  • गैरवर्तणूक, छळवणूक तसेच धमकावणे प्रतिबंधीत आहे.
  • कुठल्याही खेळाडूशी, प्रेक्षकाशी, अधिकाऱ्याशी अथवा इतर कुठल्याही व्यक्तीशी शारीरिक गैरवर्तणूक करणे, हातापायी करणे किंवा धमकावणे अथवा धमकीची भाषा वापरणे प्रतिबंधीत आहे.
  • खेळामध्ये हस्तक्षेप करणारी कुठलीही कृती, तसेच हेतूपूर्वक खेळाच्या जागेची केलेली तोडफोड, ताकद वापरुन केलेला हस्तक्षेप किंवा शिवराळ वर्तनामुळे झालेला हस्तक्षेप, या गोष्टीदेखील प्रतिबंधीत आहेत.
  • जुगार तसेच खेळाच्या निकालावर सट्टा लावण्यास देखील सक्त मनाई आहे.
  • स्पर्धेदरम्यान एखाद्या खेळाडूने स्पर्धेतील आपल्या भूमिकेबाहेर जाऊन, हातापायी अथवा अन्य कुठल्याही प्रकारच्या गोष्टीत स्वतःला जखमी करुन घेतल्यास, त्या दुखापतीची तसेच त्याच्या परिणामांची संपूर्ण जबाबदारी त्या संबंधित खेळाडूची असेल.
  • आपल्या वैयक्तिक सामानाची जबाबदारी सर्व संघ आणि खेळाडू यांचीच असेल. एखादी वस्तू चोरीला गेल्यास अथवा गहाळ झाल्यास यास आयोजक जबाबदार राहणार नाहीत.
  • प्रत्यके स्पर्धा नियोजित वेळात, नियोजित ठिकाणी सुरु होईल. तरीही स्पर्धा सुरु होण्यास विलंब झाल्यास, स्पर्धकांनी सहकार्य करावे.
  • एखाद्या खेळाडूमुळे खेळात व्यत्यय आल्यास, स्पर्धकाला ताकीद देण्यात येईल. मात्र त्यानंतरही सुधारणा न झाल्यास, स्पर्धकास अपात्र ठरवण्यात येईल.
  • स्पर्धेदरम्यान अथवा स्पर्धेला उपस्थिती लावत असताना, कुठल्याही प्रकारच्या उत्तेजक औषधांचे सेवन करणे प्रतिबंधीत आहे.
  • प्रत्येक खेळाडूने स्पर्धेदरम्यान आपले वैध ओळखपत्र सोबत बाळगावे.
  • स्पर्धेसाठीची सर्व माहिती, आराखडा, स्पर्धा, योजना, अहवाल या गोष्टींसह आयोजनाशी संबंधित सर्व प्रकारची सामग्री स्पर्धेआधी, स्पर्धेदरम्यान आणि स्पर्धेनंतरही आयोजकांच्या मालकीची राहील.
  • कार्यक्रमादरम्यान अथवा त्यानंतर कुठल्याही आकस्मिक परिस्थितीत कलह उद्भवल्यास, आयोजकांच्या मध्यस्थीने आणि हस्तक्षेपाने सोडवण्यात यावा.
  • प्रत्येक कार्यक्रमासाठी आयोजक, पंच, परीक्षक यांचे म्हणणे अंतिम राहील.
  • स्पर्धेचे स्वरुप, तारीख, ठिकाण अथवा वेळ यांमध्ये स्थानिक आयोजकांच्या मतानुसार, बदल होऊ शकतात.
  • मतभेदाच्या वेळी स्थानिक आयोजकांचा निर्णय अंतिम मानण्यात येईल. हा निर्णय स्पर्धकांना मान्य करावा लागेल.
  • कुठलाही खेळाडू वरील नियमांचे उल्लंघन करत असल्याचे आढळल्यास, त्याला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात येईल.

No comments